रावेर : राहत्या घरात एका 29 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 30 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजे पूर्वी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मयूर रमेश पाटील वय २९ असे मयत युवकाचे नाव आहे.आत्महत्या करणाऱ्या मयूर पाटील यांच्या पत्नीचा याच महिन्यात २ तारखेला मृत्यू झाला आहे. तर त्यांची आई त्यांच्या लहानपणीच मयत झाली होती. तर त्यांच्या वडिलांची प्रकृती खराब असते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. याबाबत मधुकर नामदेव पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन निंभोरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. स.पो.नि. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुरेश अढागळे तपास करत आहेत.