Friday, June 13, 2025
Homeताज्या बातम्यानिवडणूक आयोगाचा आयकॉन असलेल्या सचिन तेंडुलकरने पत्नी मुलीसह केले मतदान

निवडणूक आयोगाचा आयकॉन असलेल्या सचिन तेंडुलकरने पत्नी मुलीसह केले मतदान

मुंबई (वृत्तसंस्था)भारतीय निवडणूक आयोगाचा आयकॉन असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी आज आपल्या पत्नी आणि मुलीसह मतदानाचा हक्क बजावला.

माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि त्यांची मुलगी सारा तेंडुलकर यांनी मतदान केल्यानंतर शाई लावलेली बोटं दाखवली. यावेळी सचिन तेंडुलकरने , “मी गेल्या काही काळापासून ECI (भारतीय निवडणूक आयोग) चा आयकॉन आहे. मी जो संदेश देत आहे तो मतदान करणे आहे. ही आपली जबाबदारी आहे. मी सर्वांना बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करतो.”असे म्हटले.

दरम्यान ,राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पक्ष फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही कंबर कसल्याचं दिसून आले.

ताज्या बातम्या