Friday, June 13, 2025
Homeजळगाव जिल्हादाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

दाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील दाणा बाजार माथाडी हमाल व जनरल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच मतदानाच्या दिवशी हमाली बंद राहील असे कळविण्यात आले आहे.

एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की, दाणा बाजारातील माथाडी हमाल कामगार, हातगाडी कामगार, दुकानातील कामगारांचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे यासाठी हमाली कामकाज बंद राहील.

तसेच शहरातील इतर संघटनेतील हमाली कामगारांनी देखील आपले कामकाज बंद ठेवून मतदानाचे कर्तव्य बजवावे असे पत्रात म्हटले आहे. मतदान करणे हा राष्ट्रीय अधिकार असून प्रत्येक हमाल बांधवाने आपल्या कुटुंबीयांसह मतदान करावे असे आवाहन देखील अध्यक्ष शेषराव वलकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या