Sunday, June 15, 2025
Homeजळगाव जिल्हाआ. सुरेश भोळे हे तिसन्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील - ना. गिरीश...

आ. सुरेश भोळे हे तिसन्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील – ना. गिरीश महाजन

जळगाव:- शहर आणि जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, आपले उमेदवार प्रत्येक निवडणुकीत लाखोंच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. पक्षाने ज्यांना मोठं केलं, पदे दिली आणि तेच पक्षाला अडचणीत आणत आहेत. अशा बंडखोरांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून जळगाव शहर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आ. सुरेश दामू भोळे यांना जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरेश भोळे हे तिसन्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या