Sunday, June 15, 2025
Homeक्राईमरक्षकच बनला भक्षक; पाच वर्षीय चिमुकलीवर पोलिसाचा अतिप्रसंग

रक्षकच बनला भक्षक; पाच वर्षीय चिमुकलीवर पोलिसाचा अतिप्रसंग

पुणे वृत्तसंस्था :- अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना ताज्या असताना पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून यात बंदोबस्तावर असणाऱ्या एका पोलिसाने पाच वर्षे चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 25 रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सचिन सस्ते असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

पीडित मुलगी ही विसापुर किल्याच्या पायथ्याची राहते. तर तिच्या घरच्यांचे तिथे हॉटेल आहे. पीडित मुलीच्या आजीने दिलेल्या माहितीनुसार मुलगी ही हॉटेलजवळील वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. यावेळी मी आरोपी पोलिसाला जेवायला दिले. यानंतर मी शेतावर काम करण्यासाठी निघून गेले. यावेळी सून व भाची ही घरामध्ये स्वयंपाक बनवण्यात व्यस्त होत्या. दरम्यान, पोलिसाने मुलीला मागे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना झाल्यावर मुलगी ही रडत रडत काऊंटरजवळ तिच्या आईकडे गेली. तसेच त्या पोलिस काकांनी मला मागं नेत माझ्या अंतर्वस्त्रांमध्ये हात घातल्याचे सांगितले. यामुळे आईला मोठा धक्का बसला. तिने ही घटना तिच्या पतीला व सासुला फोन करून सांगितली. यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.
त्यानुसार सचिन शास्त्री याच्याविरुद्ध तो कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली आहे.

ताज्या बातम्या