भुसावळ : जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईदरम्यान फरार झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फरार उपनिरीक्षकाच्या घर झडतीत ४० लाख ९८ हजार ४४ रुपये किमतीचे घचाड आढळून आले आहे.
फैजपूर पोलिस ठाण्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे आणि खासगी व्यक्ती किरण
माधव सूर्यवंशी या दोघांविरुद्धभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ (अ) प्रमाणे २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान फरार झालेले उप निरीक्षक राजकिरण सोनवणे हे अद्यापही फरार आहेत, त्यांच्या भुसावळ येथील राहत्या घराची झडती घेतली असता त्यात १ लाख ४९ हजार २९० रुपये किमतीच्यादे शी, विदेशी मद्याच्या विविध बँडच्या बाटल्या, २५ लिटर गावठी हातभट्टीची दारु, बुलेट दुचाकी, किया सेलटॉस कारचे पेपर्स, ३ तोळे सोन्या चांदीचे दागिने, ९ एम. एम. पिस्टलच्या १० पुंगळ्या, १ लाख ९१ हजार रुपयेरोख रक्कम, १७ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सोने, भांदी खरेदीच्या मूळ पावल्या, याशिवाय टीव्ही, फ्रिज, एसीव इतर वस्तू आणि बँकेचे इतर कागदपत्र असा एकुण ४० लाख ९८ हजार ४४ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखालीकरण्यात आलेल्या या कारवाईचा तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.