जळगाव (प्रतिनिधी) ;- येथे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे दत्तात्रय निकम यांची नियंत्रण कक्षात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची पोलीस निरीक्षक पदी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे मंगळवारी संदीप पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.