स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
जळगाव-गावठी पिस्तुलासह मॅक्झिन घेऊन दहशत वाजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या असून त्याला शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्क भागातून 23 नोव्हेंबर रोजी शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 32 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामीर आसिफ खान वय 19 राहणार काट्या फाईल जळगाव असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नमिर आसिफ खान नावाचा तरुण हा अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन उस्मानिया पार्क परिसरात दहशत माजवीत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार बबन आव्हाड यांनी पथकाला कारवाईच्या सूचना देऊन पथकाने शनिवारी 23 रोजी रात्री आठ वाजता सुमारास संशयित समीर असिफ खान याला अटक करून त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्य फौजदार विजयसिंह पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, अक्रम शेख राहुल पाटील यांनी केली आहे.