Tuesday, July 8, 2025
Homeक्राईमनऊ गंभीर गुन्ह्यांतील सराईत 'टिचुकल्या' एमपीडीएखाली नागपूर कारागृहात रवाना

नऊ गंभीर गुन्ह्यांतील सराईत ‘टिचुकल्या’ एमपीडीएखाली नागपूर कारागृहात रवाना

नऊ गंभीर गुन्ह्यांतील सराईत ‘टिचुकल्या’ एमपीडीएखाली नागपूर कारागृहात रवाना

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील गणेशवाडी भागातील सराईत गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (वय २६) याच्यावर खून, प्राणघातक हल्ला, जीव घेण्याचा प्रयत्न, दंगल, गंभीर दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल असून, अखेर त्याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधात्मक धोका अधिनियम (MPDA) अंतर्गत कारवाई करत नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

या कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३० जून रोजी दिले. चौधरी हा जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, वर्तनात कोणताही बदल न झाल्याने MPDA अंतर्गत ही कठोर पावले उचलण्यात आली.

या संदर्भातील प्रस्ताव जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश मताफर यांनी सादर केला होता. त्यानुसार जिल्हा पोलिस प्रशासनाच्या शिफारशीनंतर ही कारवाई अमलात आणण्यात आली.

चौधरी याला नागपूर कारागृहात हलवण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप गटील, पोहेकॉ सुनील मोरे, जयंत चौधरी, रफिक शेख, विकार करवानी, सोनवणे यांच्या पथकाने विशेष बंदोबस्तात रवानगी दिली.

ताज्या बातम्या