नवी दिल्ली मुंबई -राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असतानाच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती आहे.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश प्राप्त झाले असून मात्र मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतर्फे आक्रमक भूमिका घेतली गेल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून यावर खलबते सुरू आहे. मात्र आता भाजपने स्पष्ट संकेत दिले असून पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या या घडामोडी नंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. महायुतीच्या यशात आपले अधिक योगदान असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जाऊन दबावाचे राजकारण सुरू होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी उघड मागणी करण्यात येत होती. यासाठी सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केले होते.
दरम्यान त्याच घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ म्हणून माझी ओळख निर्माण झाल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. ही ओळख सर्व पदापेक्षा मोठी वाटते. मी समाधानी आहे. नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलं नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. अडीच वर्षाच्या काळात सरकार आमच्या मागे उभे राहिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. की माझ्यामुळंकोणतीही अडचण होणार नाही हे मी मोदींना सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले.