Sunday, June 15, 2025
Homeराष्ट्रीयफॉर्च्यून मॅगझिनच्या यादीत मुकेश अंबानी एकमेव भारतीय

फॉर्च्यून मॅगझिनच्या यादीत मुकेश अंबानी एकमेव भारतीय

मुंबई :-रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते देशाचेच नव्हे, तर जगातील शक्तिशाली उद्योगपती आहेत. फॉर्च्यून मॅगझिनच्या २०२४च्या ताकदवान उद्योगपतींच्या यादीत स्थान मिळवणारे मुकेश अंबानी एकमेव भारतीय आहेत. या यादीत परदेशात स्थायिक असलेले भारतीय वंशाचे आणखी सहा व्यक्तीदेखील

समाविष्ट आहेत. हे व्यक्ती मोठ्या व्यवसायांचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नवप्रवर्तक आहेत. फॉर्च्यूनने अलीकडेच व्यवसाय जगातील १०० सर्वात शक्तिशाली

काम करत आहे. फॉर्च्यूनच्या

लोकांची यादी जाहीर केली आहे, ज्यात मुकेश अंबानींना १२वे स्थान मिळाले आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला नवी उंची गाठवून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिओ लॉन्च करून त्यांनी देशातील दूरसंचार क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. देशाच्या डिजिटलायझेशनला त्यामुळे विकासाला प्रोत्साहन मिळाले आहे. किरकोळ क्षेत्रातही कंपनी नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. ग्रीन एनर्जी क्षेत्रातही कंपनी जोरदार

ताकदवान उद्योगपतींच्या २०२४च्या यादीत मुकेश अंबानींच्या शिवाय, जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क पहिल्या स्थानावर आहेत, तर एनवीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग दुसऱ्या स्थानावर आहेत. सत्या नडेला तिसऱ्या, वॉरन बफे चौथ्या आणि जे.पी. मॉर्गनचे जैमी डायमन पाचव्या क्रमांकावर आहेत. टिम कुकला यादीत सहावे स्थान मिळाले असून, मार्क झुकरबर्ग सातव्या आणि सॅम अल्टमन आठवे सर्वांत ताकदवान उद्योगपती आहेत. मॅरी बारा आणि सुंदर पिचाई अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानींना १२व्या क्रमांकावर येण्यापूर्वी, ११व्या स्थानावर अॅमेझॉनचे जेफ बेजोस आहेत.

ताज्या बातम्या