Friday, June 13, 2025
Homeजळगाव जिल्हाआमदार राजूमामा भोळे यांची विजयाची हॅट्रिक !

आमदार राजूमामा भोळे यांची विजयाची हॅट्रिक !

जयश्री महाजन यांचा पराभव; गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांची जल्लोषात मिरवणूक

जळगाव:-जळगाव शहर मतदार संघात तिसऱ्यांदा उमेदवारीच्या रिंगणात उतरलेले आमदार राजू मामा भोळे यांनी माजी महापौर जयश्रीताई महाजन यांचा 70 हजार मतांच्या फरकाने पराभव करून विजयाची हॅट्रिक केली असून त्यांना भाजपचे निष्ठेचे फळ म्हणून मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

जळगावकरांचे मामा अशी ओळख असलेले राजू मामा भोळे हे तिसऱ्यांदा भाजप च्या तिकिटावर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यांना खरे आव्हान माजी महापौर जयश्रीताई महाजन यांचे तगडे आव्हान होते. तसेच माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे, आणि उबाठा गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या बंडखोरीचे आव्हानही आमदार राजू मामा भोळे यांना होते. मात्र गतकाळात आमदार राजू मामा भोळे यांनी केलेली विकास कामे व विकासासाठी आणलेला मोठा निधी, तसेच लाडकी बहीण योजना यामुळेही आमदार राजू मामा भोळे यांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे. रात्री अपरात्री मदतीला धावून जाणारा आमदार म्हणून राजू मामा भोळे यांची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होईल असेच चित्र आज होत असलेल्या निकालामुळे दिसून येत आहे. महायुती सरकार मध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरणार आहे. आमदार राजू मामा भोळे यांना आता सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी असून मंत्री झाल्यानंतर जळगावचा विकास हा आणखी वेगाने होऊ शकतो असे बोलले जात आहे. दरम्यान राजू मामा भोळे यांनी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि जळगावकरांचे असणारे प्रेम यामुळेच विजय मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले आहे.

विजयासाठी मेहनत घेणारे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाई (आठवले), लोकजनशक्ती पक्ष, पिरीप आदी महायुतीतील घटकांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही आ. राजूमामा भोळे यांनी आभार मानले आहे. मागील १० वर्षांच्या काळात ५० टक्के कामे पूर्ण करून २५ टक्के कामांचे भूमिपूजन झाले आहे. या भूमिपूजन झालेल्या कामांची पुर्णता पुढील काळात नक्कीच केली जाणार आहे. तर २५ टक्के कामे प्रस्तावित असून त्यालाहि पूर्णत्व देण्यासाठी पाठपुरावा जाईल, अशीही माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली.

ताज्या बातम्या