Friday, June 13, 2025
Homeक्राईमजळगाव एमआयडीसी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, मालेगावातून 11 लाखांचा चोरीस गेलेल्या डंपरचा अवघ्या...

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, मालेगावातून 11 लाखांचा चोरीस गेलेल्या डंपरचा अवघ्या दोन दिवसात शोध!

जळगाव प्रतिनिधी- सध्या नुकतेच बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अवघ्या काही दिवसातच  कारवाईचा धडाका लावला असून अवैध गॅस भरणा केंद्र येथे धाड टाकून 34 गॅस सिलेंडर जप्त केल्याची कारवाई केल्यानंतर आता नुकतेच एमआयडीसी पोलिसांनी आणखी कौतुकास्पद कारवाई करून 11 लाखांचा डंपर नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तालुक्यातील लोणवाडे येथून 11 डिसेंबर रोजी   चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी या डंपर चा शोध घेतला असता तो फातिमानगर येथे निर्जन स्थळी आढळून आला. हा डंपर एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव तालुका पोलिसांना ताब्यात दिला आहे. एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की

नाशिक जिल्हा येथील मालेगाव तालुका पोलिस स्टेशन येथे डंपर चोरीचा गुन्हा दाखल असून  गुन्ह्यातील फिर्यादी  ऋषिकेश महारू मोरे यांचा मालकीचा 11,00,000 /- रुपये किमतीचा डंपर क्र एम एच 15 डी के- 9753 हा लोनवाडे येथून दि 11 डिसेंबर रोजी चोरी गेला होता.

सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी  पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना सदरचा डंपरचा शोध घेणे बाबत कळविले असता पोलिस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील पोउपनि शरद बागल यांना सदर डंपरचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शरद बागल यांनी पोका विशाल कोळी, राहुल रगडे यांच्यासह सदर डंपरची सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या सहाय्यानं पाहणी करीत असता सदरील डंपर हा एमआयडीसी परिसरात गेल्याचे दिसून आल्याने सतत दोन दिवस संपूर्ण परिसर मागवा घेत असताना 13 डिसेंबर रोजी  चोरीस गेलेला डंपर हा फातिमा नगर परिसरात निर्जन स्थळी उभा असल्याचे दिसून आला.  डंपर हा पंचनामा कारवाई करून ताब्यात घेऊन मालेगाव तालुका पोलिस स्टेशनशी संपर्क करून त्यांचा ताब्यात देण्यात आला.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक  महेश्वर रेड्डी,  अप्पर पोलीस अधीक्षक  अशोक नखाते, मा उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक संदीप पाटील , पोउपनि शरद बागल , पोकॉ विशाल कोळी, राहुल रगडे,पोना योगेश बारी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या