Friday, June 20, 2025
Homeताज्या बातम्यामाजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था :- देशाच्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 26 रोजी उपकारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?

भारतातील ‘राष्ट्रीय दुखवटा’ हा संपूर्ण देशाचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक असा मार्ग आहे. ‘राष्ट्रीय दुखवटा’ एखाद्या ‘व्यक्तीच्या’ निधनानंतर किंवा पुण्यतिथीला पाळला जातो. भारताच्या ध्वज संहितेनुसार, राष्ट्रीय दुखवट्यावेळी,भारतासह परदेशातील भारतीय संस्थांमध्ये (दूतावास, सरकारी संस्था) राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. या काळात कोणतेही औपचारिक आणि अधिकृत काम केले जात नाही. मेळावे आणि अधिकृत सरकारी मनोरंजनपर कार्यक्रमावरही बंदी असते. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर त्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात.

राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. यासंदर्भात कठोर आणि ठोस असा कोणताही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय, अतुलनीय योगदान देत देशाचे नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो.

देशाचे तेरावे पंतप्रधान – २२ मे २००४ ते २६ मे २०१४.

राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते – २१ मार्च १९९८ ते २१ मे २००४.

केंद्रीय अर्थमंत्री – २१ जून १९९१ ते १६ मे १९९६.

नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष – १५ सप्टेंबर १९८२ ते ३१ ऑगस्ट १९८७.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर – १५ सप्टेंबर १९८२ ते १५ जानेवारी १९८५.

ताज्या बातम्या