Sunday, June 15, 2025
Homeएरंडोलजळगाव जिल्ह्यातील 11 जागांवर महायुतीचेच वर्चस्व

जळगाव जिल्ह्यातील 11 जागांवर महायुतीचेच वर्चस्व

निवडणुकीच्या आखाड्यात विरोधकांना चारली धूळ, गुलाबराव पाटील,राजूमामा भोळे ,किशोर पाटील, यांची विजयाची हॅट्रिक

अमोल पाटील, अमोल जावळे या नव्या चेहऱ्यांना संधी

जळगाव-जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघाचे निकाल 23 रोजी लागले असून या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या यशामुळे जिल्ह्यात एकही विरोधक आमदार उरला नसल्याने विरोधकांना चांगलीच धूळ चारली आहे. भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे पाच उमेदवार, आणि अजित पवार राष्ट्रवादी गटातून एक उमेदवार असे एकूण 11 उमेदवार विजयी झाले आहेत.

तसेच मंत्री गुलाबराव पाटील, राजू मामा भोळे आणि किशोर पाटील यांनी विजयाची हॅट्रिक मारली आहे. तसेच जिल्हा वास यांनी एरंडोल पारोळा मतदार संघाचे अमोल पाटील आणि रावेर मतदार संघाचे अमोल जावळे यांच्या रूपाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात संपूर्णपणे भगवा झेंडा फडकला आहे.

आमदार राजू मामा भोळे यांची हॅट्रिक

लाडकी बहीण योजना कर्जमाफी वीज बिल माफी यासह एसटी प्रवासात सवलत अशा विविध योजना महायुती सरकारने आणल्या होत्या याचा फायदा सर्वच महायुतीच्या उमेदवारांना झाला आहे. जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे हे तिसऱ्यांदा निवडणुकीत जिंकले असून त्यांनी जयश्री महाजन यांचा 87 हजार 503 मतांनी पराभव केला. जयश्री महाजन यांना 64033 मते मिळाले. तर राजू मामा भोळे यांना एक लाख 51 हजार 536 मते मिळाली. तसेच अपक्ष उमेदवारी दाखल केलेले डॉक्टर अश्विन सोनवणे यांना 6 हजार 920 तर कुलभूषण पाटील यांना 3 हजार 35 मते मिळाली.

जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन सातव्यांदा विजय

जामनेर मतदार संघात मंत्री गिरीश महाजन यांचे एकेकाळी असलेले सहकारी दिलीप खोडपे यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी दाखल केली होती. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून होते. मात्र गिरीश महाजन यांनी विकासाच्या जोरावर एक लाख 28 हजार 667 मतांनी विजयी होत दिलीप खोडपे यांचा 26 हजार 825 मतांनी पराभव केला.

चाळीसगाव मतदार संघात मंगेश चव्हाण दुसऱ्यांदा विजयी

चाळीसगाव मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवणारे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे मित्र असलेले उन्मेष  पाटील यांचा 85 हजार 653 मतांनी पराभव करून एक लाख 57 हजार एक मतांनी विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उन्मेष पाटील यांना 71 हजार 448 मते मिळाली. या मतदारसंघातील लढतीकडे हाय व्होल्टेज लढत म्हणून पाहिले जात होते यात मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली.

जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील यांचा तिसऱ्यांदा विजय

जळगाव ग्रामीणमध्ये दोन गुलाबरावांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. यात विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री असलेले गुलाबराव देवकर यांचा 59 हजार 232 मतांनी पराभव केला. गुलाबराव पाटील यांनी एक लाख 43 हजार 408 मतांची विजयश्री मिळवत गुलाबराव देवकर यांना धूळ चारली. गुलाबराव देवकर यांना 84 हजार 176 मते पडली.

किशोर पाटील यांची हॅट्रिक

पाचोरा भडगाव मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी उबाठा गटाच्या वैशालीताई सूर्यवंशी यांचा 38 हजार 689 मतांनी पराभव करून 97 हजार 366 मतांनी किशोर पाटील विजयी झाले. किशोर पाटील यांच्यासमोर माजी आमदार दिलीप वाघ आणि भाजपचे अमोल शिंदे यांच्या उमेदवारीचे आव्हान उभे होते. अमोल शिंदे यांना 58 हजार 71 तर दिलीप वाघ यांना अवघे 5259 मते मिळाली. किशोर पाटील यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे.

भुसावळ मतदार संघातून भाजपचे संजय सावकारे यांनी मारला चौकार

भुसावळ विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले भाजपचे उमेदवार संजय सावकारे यांनी काँग्रेसचे तुल्यबळ उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांचा 47 हजार 488 मतांनी पराभव केला. संजय सावकार यांना एक लाख 7259 मते मिळाली तर मानवतकर यांना 59 हजार 771 मते मिळाली.

अमळनेरातून मंत्री अनिल पाटील विजयी

अमळनेर मतदार संघातून मंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विजय संपादन केला असून त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांचा 33 हजार 435 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात काँग्रेसचे अनिल शिंदे यांना अवघी 13 हजार 798 मते मिळाली.

चोपडा मतदार संघात चंद्रकांत सोनवणे विजयी

चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे हे विजयी झाले असून त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे यांचा 32 हजार 313 मतांनी पराभव केला. चंद्रकांत सोनवणे यांना एकूण एक लाख 22 हजार 826 मते मिळाली तर प्रभाकर सोनवणे यांना 90 हजार 513 मते मिळाली.

एरंडोल मतदारसंघात अमोल पाटील विजयी

एरंडोल पारोळा मतदार संघात चौरंगी लढतीचे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांना यंदा शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. नवख्या अमोल पाटलांसमोर माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचे तगडे आव्हान होते. तसेच माजी खासदार एटी नाना पाटील, भगवान पाटील यांचे देखील आव्हान होते. मात्र अमोल पाटील हे एक लाख 1088 मतांनी विजयी झाले.

मुक्ताईनगर मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा विजयी

मुक्ताईनगरः विधानसभा निवडणूकीत राज्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर मतदार संघाच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाचे आ. चंद्रकांत पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणत शरद पवार गटाच्या अॅड. रोहीणी खडसेंचा तब्बल २३ हजार ९०४ मतांनी पराभव केला. चंद्रकांत पाटील यांनी अस्तित्व कायम राखले असले आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. चंद्रकांत पाटील यांना १ लाख ११ हजार ६०१ मते मिळाली तर रोहीणी खडसेंना ८७ हजार ६५६ मते मिळाली.

रावेर विधानसभा मतदारसंघात अमोल जावळे विक्रमी मताधिक्याने विजयी

रावेर रावेर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार अमोल जावळे यांनी १ लाख १३ हजार ६७६ मते मिळवत विक्रमी विजय मिळवला, त्यांनी काँग्रेसचे धनंजय चौधरी यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला.

१९९९ पासून रावेर, यावल • विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाने विजय मिळवत वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर काँग्रेसने विजय मिळवला, तेव्हापासून दोन पंचवार्षिक सलग एकाही पक्षाची सत्ता रावेर, यावल विधानसभेत आलेली नाही, तीच परंपरा आता कायम राहिल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भाजपचे अमोल जावळे यांनी १ लाख १३ हजार ६७६ मिळवत काँग्रेसच्या धनंजय चौधरी यांचा तब्बल ४३ हजार मतांनी पराभव केला. धनंजय चौधरी यांना ७० हजार ११४ मते मिळाली आहेत.

 

ताज्या बातम्या