Friday, June 13, 2025
Homeखानदेशमहापालिकेतर्फे गोलाणी मार्केटमध्ये स्वच्छता अभियानातून २४ टन कचरा संकलित

महापालिकेतर्फे गोलाणी मार्केटमध्ये स्वच्छता अभियानातून २४ टन कचरा संकलित

महापालिकेतर्फे गोलाणी मार्केटमध्ये स्वच्छता अभियानातून २४ टन कचरा संकलित

जळगाव प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त श्री ज्ञानेश्वर ढेरे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने रविवारी महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत वल्लभदास वालजी मार्केट (गोलानी मार्केट) येथे विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली . या मोहिमेसाठी महानगरपालिकेकडून जळगाव शहरातील आरोग्य विभागाचा साफसफाईचा मक्ता घेतलेले मक्तेदार मे वाटरग्रेस प्रॉडक्ट नाशिक यांचे कडील 344 सफाई कामगारांच्या मार्फत संपूर्ण गोलानी मार्केटची साफसफाई करण्यात आली. त्यातून निघालेला साधारण २४ टन कचरा ७ पिकअप व १ ट्रॅक्टर च्या एकूण बारा ट्रिप कचरा उचलून मनपा कचरा डेपो येथे वाहतूक करण्यात आला.

तसेच सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर धडक कारवाई करण्यात आली. गोलाणी मार्केट येथील फुल विक्रेते गोरख अमृत काटोले यांचे कडून १० किलो, केक पॅलेस यांचे कडुन १० किलो, जैन प्लास्टीक यांचे कडुन 30 किलो प्लास्टीक कॅरी बॅग जप्त करून प्रत्येकी 5000 रुपये प्रमाणे एकुण 15000 दंड आकारण्यात आला.

सदर मोहीम मनपाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे , आरोग्य निरीक्षक मनोज पाटील , रुपेश भालेराव ,मनोज राठोड , विशाल वानखेडे, प्रदीप धापसे, आकाश पाटील , देवयानी भदाणे, संघमित्रा सपकाळे , उज्वल बेडवाल , मंगेश भदाणे, सतीश करोसिया, मुकादम रवी संकत , आनंद मरसाळे , विशाल चांगरे , शरद पाटील , भगवान तायडे , राजेंद्र ठाकूर , राजेंद्र निळे , भीमराव सपकाळे , मयूर सोनवणे , जगन्नाथ पाटील , किशोर भोई , राहुलने निधाने, राहुल पवार, दीपक भावसार , वालिदास सोनवणे , विकी डोंगरे , इमरान भिस्ती , शंकर आंबोरे यांच्यासह कर्मचारी यांनी पुर्ण केली.

ताज्या बातम्या