Sunday, June 15, 2025
Homeअध्यात्मिकमहाकुंभ मेळ्यासाठी योगी सरकारने जाहीर केला स्वतंत्र जिल्हा

महाकुंभ मेळ्यासाठी योगी सरकारने जाहीर केला स्वतंत्र जिल्हा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)अवघ्या दोन महिन्यांवर महाकुंभमेळा आलेला असताना देशभरातल्या भाविकांनी प्रयागराजला जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाकुंभ मेळ्यासाठी एक आख्खा स्वतंत्र जिल्हाच योगी सरकारनं जाहीर केला आहे. या जिल्ह्याचं पूर्ण व्यवस्थापन स्वतंत्र असेल. शिवाय या जिल्ह्याचं नावदेखील महाकुंभमेळ्यावरूनच ठेवण्यात आलं आहे.

पुढील वर्षी १३ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होईल. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा भक्तीसोहळा चालेल. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं. यामध्ये लाखोंच्या संख्येनं देश-विदेशातून भाविक, साधू, तपस्वी येतात. प्रशासनाला या काळात या भागातील व्यवस्थापनासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला जातो. आत्तापर्यंत प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महाकुंभमेळ्याचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं. पण आता महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या