जळगाव : येथील रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग मध्ये वाहन घेण्यासाठी गेलेल्या तरुणाची लॅपटॉप असलेली बॅग अज्ञात यांनी लांबवल्याची घटना 25 रोजी घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोजी
शहरातील अयोध्या नगरातील रहिवासी पुष्कर हेमंत पाटील हा तरुण पुणे येथील एका कंपनीत नोकरीस आहे. दि. २२ रोजी त्यांना पुणे येथे काम असल्याने त्यांनी रेल्वे स्टेशनजवळील पार्कीगमध्ये लावून ते पुण्याला गेले होते. त्यानंतर दि. २५ रोजी ते जळगावला आल्यानंतर त्यांनी लॅपटॉपची बॅग काऊंटवर ठेवली आणि ते दुचाकी घेण्यासाठी पार्कीगमध्ये गेले. यावेळी चोरट्याने त्यांची लॅपटॉपची बॅग चोरुन नेली. तरुणाने संपुर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला, मात्र तरी देखील त्यांना बॅग मिळून आली नाही. अखेर त्यांनी शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.