जळगाव : सुरेशदादांनी शहराचा विकास कसा असतो याचे एक उत्तम उदाहरण दाखवून दिले होते. त्यांच्या नेतृत्वात काम करतांना नेहमीच काही ना काही नवीन शिकायला मिळत असे. केवळ जनतेशी व जनहिताशी प्रामाणिक राहून काम कसे कराचे हे मी त्यांचेकडून शिकले आहे. आज माझ्या गुरुंनी मला ‘विजयी भव’ म्हणून दिलेला आशीर्वादामुळे उत्साह निर्माण झाला आहे असे मत जळगाव शहर मतदार संघाच्या महविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी सांगितले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व जळगाव शहराचे नऊ वेळा
विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शहर विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांना आशीर्वाद दिलेत. गुरु-शिष्यांची झालेली ही जिव्हाळ्याची भेट अत्यंत सुहवयपूर्ण वातावरणात झाली.
तळागाळातल्या जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम कर, जनतेशी प्रामाणिक रहा असे त्यांनी मला सांगीतले. १९८० पासून ते २०१४ पर्यंत सलग विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेले सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनात एक कार्यकती महणून जयश्री महाजन यांनी आपली
राजकीय कारकिर्द सुरु केली होती. दादांनी त्यांना नगरसेविका पदाची संधी दिली. त्यांचे पती डॉ. सुनिल महाजन यांना सुद्धा सुरेशदादा जैन यांनी नगरसेवक तसेच उपमहापौर पदाची संधी दिली. वाया राजकीय पटलावरुन बाजूला झाल्यावर देखील महाजन दाम्पत्याचे सुरेशदादा जैन याचेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध कायम राहीलेत. सौ. महाजन यांनी शहराचे महापौरपद देखील भुषविले. महापौर पदी विरामान झाल्यावर देखील सुरेशदादा जैन यांची जयश्री महाजन यांना आशीर्वाद दिला होता. लोकांची चांगली कामे कर अशी अपेक्षा व्यक्त केली होती.