जळगाव प्रतिनिधी I जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात पाईप चोरी प्रकरणी पोलीस मुख्य आरोपीला पाठीशी घालत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आज जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्याचे आदेश जारी केले आहेत.
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी महानगरपालिकेच्या पाईप चोरी प्रकरणात मुख्य संशयित आरोपीचे नाव चुकवून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्न उपस्थित करून विधिमंडळाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या बदली होण्याचे चर्चा सुरू आज त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर या सोबतच सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी नीलेश गायकवाड यांची एरंडोल येथे तर एरंडोलचे प्रभारी सतीश गोराडे यांची सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली. गोराडे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे.