Thursday, June 12, 2025
Homeजळगाव जिल्हाजयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचारार्थ आज आ. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा

जयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचारार्थ आज आ. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा

जळगाव ;-शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचारार्थ आज (दि. १५) रोजी रात्री ८ वाजता शहरातील सुभाष चौक येथे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. राजकीय निरीक्षकांची नजर या सभेकडे आहे.

यापूर्वी मंत्रीपद सोडल्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांनी सुभाषचौकात जाहीर सभेला संबोधित केले होते. ती सभा गाजली होती. त्यांनतर आज त्यांची पुन्हा याच ठिकाणी सभा होत आहे. आ. खडसे यांचे अभ्यासपूर्ण व दणकेबाज भाषणांसाठी राज्यात नाव घेतले जाते. त्यातच सुभाष चौक येथील सभांना ऐतिहासिक महत्व आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून येथे झालेल्या राजकीय सभा गाजल्या आहेत.

ज्यांना त्यांनी घडविले, मोठे केले ते साथ सोडून गेल्यानंतर त्यांच्या विरोधात खडसे आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शहरात विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांच्या विरोधात जयश्री महाजन यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे दिसत असतांना ही सभा होत आहे. विशेष म्हणजे एखाद्या निवडणुकीसाठी जळगाव शहरात सभा घेण्याची आ. खडसे यांची गेल्या दहा वर्षानंतरची ही पहिली वेळ आहे. राजकीय कार्यकर्ते व राजकीय निरीक्षकांमध्ये या सभेबद्दल कुतुहूल आहे.

ताज्या बातम्या