Monday, June 22, 2026
Homeक्राईमचार जिल्ह्यातून दुचाकी लांबविणारा अट्टल चोरटा जाळ्यात ; 10 दुचाकी हस्तगत

चार जिल्ह्यातून दुचाकी लांबविणारा अट्टल चोरटा जाळ्यात ; 10 दुचाकी हस्तगत

धुळे तालुका पोलिसांची कारवाई, ;  धुळे ,जळगाव, नंदुरबार, मालेगावच्या गुन्ह्यांची उकल

धुळे प्रतिनिधी ;– जळगाव ,धुळे नंदुरबार आणि नाशिक

या चार जिल्ह्यांमधून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला  गुन्हेगाराला धुळे तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चार लाख दहा हजार रुपयांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. तसेच जळगाव नंदुरबार आणि मालेगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

प्रदीप मधुकर सैंदाणे वय 35 रा. महिंदळे ता. जि. धुळे असे संशयित आरोपीचे नाव आहे. प्रदीप सैंदाणे याने धुळे तालुका पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील  दुचाकी चोरली असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून हे दुचाकी हस्तगत करण्यात करण्यात आले असून त्याच्याकडून आणखी नऊ दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहे. यात नंदुरबार शहर पोलीस स्टेशन, जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, आणि मालेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यातील तीन दुचाकी चोरीची त्याने कबुली दिली. आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या इतर दुचाकी त्याने कुठून चोरल्या व त्याचे साथीदार कोण याचा पोलीस तपास करीत आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, किशोर खैरनार, मनोज बाविस्कर, सखाराम खांडेकर, कुणाल शिंगणे, राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, राहुल देवरे, महेंद्र गिरासे आदींच्या पथकाने केली.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या