Friday, June 13, 2025
Homeताज्या बातम्यागटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया 'एक है तो सेफ...

गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया ‘एक है तो सेफ है’!

मुंबई वृत्तसंस्था महाराष्ट्रात महायुतीने मोठे यश संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री कोण? यावर गेल्या दहा दिवसांपासून तिढा सुरू होता. मात्र आज भाजपच्या विधिमंडळ गटनेते निवड बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवड होताच देवेंद्र फडणवीस यांनी एक हे तो सेफ है अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची गटनेता निवडीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी एकमताने निवड केली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले , सर्वप्रथम मी सर्व आमदारांचे आभार मानतो. सर्व आमदारांनी एकमताने माझी गटनेतेपदी निवड केली. खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की या वेळची निवडणूक ही ऐतिहासिक राहिली. या निवडणुकीने आपल्या समोर एक गोष्ट ठेवली. ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरु झाली. महाराष्ट्राने जे बहुमत आपल्याला दिलं. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह काही राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांचे आणि जनतेचे आभार मानले. तसेच आमदारांना संबोधित करत असताना एक है तो सेफ है असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

ताज्या बातम्या