ब्रेकिंग: दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपची विजयाकडे आगेकूच ; 45 जागांवर घेतली आघाडी
आप 27 जागांवर तर काँग्रेस शून्यावर !
दिल्ली वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाले असून दिल्लीत भाजपाकडून कार्यकर्त्यांनी दिल्ली सह देशात जल्लोषाला सुरुवात केली आहे आहे. सध्याच्या कलानुसार भाजपाने 45 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप 27 जागांवर पुढे आहे. काँग्रेसच्या खात्यात एकही मत गेलेले नाही..
अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा हॅट्रिक करणार की भाजप 26 वर्षानंतर दिल्लीत सत्ता स्थापित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक निकालाचा एकंदरीत कल पाहता भाजपने विजयाकडे वाटचाल केली असून मतदारांनी आम आदमी पक्षाला तिसऱ्यांदा संधी देत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तर काँग्रेस ला अध्यापही एकही उमेदवार निवडून आलेला दिसत नसल्याने काँग्रेस ला भोपळाही फोडता आलेला नाही.
राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते.
सविस्तर वृत्त लवकरच….