Sunday, June 15, 2025
Homeजळगाव जिल्हामुख्यमंत्री कोण होणार ? सस्पेन्स कायम !

मुख्यमंत्री कोण होणार ? सस्पेन्स कायम !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :– महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर आज जवळपास पाच दिवस उलटून देखील सत्ता स्थापन करण्याकरता महायुतीकडून अद्यापही हालचाल झालेली दिसून येत नाही. तसेच मुख्यमंत्री पदाचा तिढा अजून तरी सुटला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

एकीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकी सुरू असून सरकार स्थापन करण्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा दाखल केल्याचं बोलले जात असताना त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये नवी दिल्लीतील भाजप नेते जो निर्णय घेतील तो आपणास मान्य असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

तसेच आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून दिल्लीतील नेत्यांचा निर्णय मान्य असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. त्यामुळे भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने मोठा भाऊ या नात्याने भाजपाचा मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब होणे बाकी असले तरी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे.

या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत महाराष्ट्रातील या तीन्ही नेत्यांची गृहमंत्री अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्याबरोबर महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावाबाबत चर्चा होऊन सरकार स्थापनेचा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून कळते.

भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी मंदिरांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी आरती साकडे, प्रार्थना देवाकडे केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हा सस्पेन्स अजून तरी कायम आहे. मुख्यमंत्री च्या नावाच्या घोषणाकडे महाराष्ट्र वासियांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या