मुंबई वृत्तसंस्था ;-एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवाशी बोटीला इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने मोठा अपघात घडला. त्यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 101 जणांना वाचवण्यात यश आलं. नीलकमल नावाच्या बोटमधून प्रवाशी एलिफंटाकडे जात होते. त्यावेळी उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली.
प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. या जोरदार धडकेत नीलकमल बोट बुडाली. अपघातावेळी बोटीमध्ये शंभरच्या वर प्रवासी आणि 5 बोटीचे सदस्य होते.