Friday, June 20, 2025
Homeक्राईमनिवडणूक कर्तव्यावर असलेल्या बीएलओचा अपघाती मृत्यू

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या बीएलओचा अपघाती मृत्यू

चोपडा : तालुक्यातील अनवर्दे – बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले तथा शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील रहिवासी व या निवडणुकीत बीएलओ असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९) यांचा निवडणूक काम आटोपून बभळाज येथील राहत्या घरी दुचाकीने जात असताना गलंगीजवळ २० रोजी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या आपघातात निधन झाले. लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे तालुक्यातील अनवर्दे – बुधगांव येथे उपशिक्षक म्हणून

कार्यरत होते. त्याच ठिकाणी ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ होते. तेथून निवडणुकीचे काम आटोपून ते आपल्या शिरपूर तालुक्यातील मूळ गाव बभळाज येथे परत जात असतांना त्यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्न रात्रीी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्युची वार्ता समजताच ग.स.चे संचालक योगेश सनेर यांच्यासह मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली होती.

ताज्या बातम्या