Friday, June 13, 2025
Homeताज्या बातम्याभंडारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के !

भंडारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के !

नागपूर (वृत्तसंस्था)  ;-राज्यतील भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) यांच्या माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र आहे. जिल्ह्यात आज सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.3 किश्टर स्केल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, “भंडारा जिल्ह्यात सध्याच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची झालेली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेता येईल,” असे प्रशासनाने सांगितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना आवाहन Earthquake ।
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या