Friday, June 20, 2025
Homeक्राईमशिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न

अमृतसर (वृत्तसंस्था )येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

https://x.com/ANI/status/1864159596333449666?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1864159596333449666%7Ctwgr%5E5a798b251eb7287694c94da51b7a75f641f9ae8a%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2Fhttps://twitter.com/i/status/1864159596333449666

 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला रोखलं व त्याला ताब्यात घेतलं. नारायण सिंह असं आरोपीचं नाव आहे. सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासाठी ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी अचानक एक व्यक्ती आला व त्याने सुखबीर सिंग बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडलं. आरोपी खालसाशी संबंधित असल्याचा संशय आहे.

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. गळ्यात फलक आणि हातात भाला घेऊन ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी हल्ल्याचा प्रयत्न झाला. 2 डिसेंबरला श्री अकाल तख्त साहीबने त्यांना ही शिक्षा दिली आहे. 2007 ते 2017 दरम्यान पंजाबमध्ये सत्तेवर असताना त्यांच्या पक्षाने आणि सरकारने केलेल्या चुकीबद्दल श्री अकाल तख्त साहीबने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.

ताज्या बातम्या