Friday, June 20, 2025
Homeक्राईममतदान ड्युटीवर जाणाऱ्या वाहनाला अपघात: चार महिला कर्मचारी जखमी

मतदान ड्युटीवर जाणाऱ्या वाहनाला अपघात: चार महिला कर्मचारी जखमी

यावल तालुक्यातील किनगाव जवळील घटना
: जळगाव:-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वाहन घसरल्याने झालेल्या अपघातात चार महिला कर्मचारी जखमी झाल्याची घटना यावल तालुक्यातील किनगाव जवळ आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेत शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने, ज्योती गोपीचंद भादले ,कविता बाविस्कर आणि लतिफा परविन चान खान अशी जखमी महिला कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर किनगाव येथे उपचार करून त्यांना चोपडा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.

ताज्या बातम्या