Tuesday, May 19, 2026
HomeBlogपोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर धडक कारवाई

पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर धडक कारवाई

पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर धडक कारवाई

वाईन शॉप परिसरात छापेमारी; तळीरामांची धुंदी उतरवली

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मुख्य रस्त्यांवर आणि वाईन शॉप परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या तळीरामांविरोधात जळगाव पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेचे नेतृत्व स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. एसपी अचानक रस्त्यावर उतरल्याने मद्यपींची चांगलीच तारांबळ उडाली.

गोपनीय अंमलदारांची विशेष बैठक; कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘इंटेलिजन्स’ मजबूत करण्यावर भर

गोपनीय अंमलदारांची विशेष बैठक; कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘इंटेलिजन्स’ मजबूत करण्यावर भर

वाढत्या तक्रारींनंतर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

शहरातील विविध वाईन शॉप्स, बिअर शॉपी तसेच रस्त्यांच्या कडेला उघड्यावर मद्यप्राशन होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. यामुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी मद्यपींकडून शिवीगाळ आणि गोंधळाच्या घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली.

वाईन शॉप्सबाहेर अचानक छापेमारी

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः पथकासह शहरात गस्त घालत विविध भागांत अचानक छापेमारी केली. वाईन शॉप्सच्या आडोशाला बसून मद्यप्राशन करणाऱ्यांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेत कारवाई केली. पोलिसांचा हा अचानक धडाका पाहून अनेक मद्यपींनी घटनास्थळावरून पळ काढण्याचाही प्रयत्न केला.

नियम मोडणाऱ्या वाईन शॉप चालकांनाही इशारा

या मोहिमेमुळे सार्वजनिक नियमांकडे दुर्लक्ष करून मद्यपींना आडोसा उपलब्ध करून देणाऱ्या काही वाईन शॉप चालकांचेही धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी संबंधित ठिकाणांची पाहणी करत नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत

पोलिसांच्या या तडकाफडकी कारवाईनंतर शहरातील नागरिकांनी, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सार्वजनिक ठिकाणी वाढलेला उपद्रव रोखण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून, अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याची मागणीही होत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या