Thursday, September 17, 2026
Homeखानदेशआंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

जळगाव प्रतिनिधी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. या योजनेंतर्गत समाज कल्याण विभागास एकूण २०८ प्रस्ताव प्राप्त झाले असून, यावर्षी उपलब्ध तरतुदीनुसार रु. ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

यामधून ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे., कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकार करिश्मा नायर यांचे हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.यावेळी संबंधित लाभर्थ्यांना करिश्मा नायर यांनी भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रभारी समाजकल्याण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते.

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन सामाजिक सलोखा, समता आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा भर आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या