Saturday, May 2, 2026
Homeजळगाव जिल्हासोनं झालं ‘सोनेरी’ आणि चांदीची चकाकी वाढली !

सोनं झालं ‘सोनेरी’ आणि चांदीची चकाकी वाढली !

सोनं झालं ‘सोनेरी’ आणि चांदीची चकाकी वाढली !

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले 

जळगाव प्रतिनिधी

सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईचा काळ सुरू असताना सोन्या-चांदीच्या दरांनी नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. किंमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह तब्बल ९०,६०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला आहे, तर चांदीनेही नवा विक्रम प्रस्थापित करत १,०४,००० रुपये प्रतिकिलो हा टप्पा पार केला आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांनी खरेदीला ब्रेक लावल्याचे चित्र सराफ बाजारात पाहायला मिळत आहे.

दरवाढीमागील कारणे

गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, वाढीव आयात शुल्क आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याला मिळणारी प्राधान्यतामुळे दर गगनाला भिडले आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे जागतिक व्यापारयुद्धाच्या भीतीत वाढ झाली होती. परिणामी, गुंतवणूकदारांनी सोने खरेदीकडे अधिक कल दाखवला आणि त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर झाला.

लग्नसराईत खरेदीला फटका

सणासुदीच्या हंगामात आणि लग्नसराईत पारंपरिक दागिन्यांची मोठी खरेदी होते. मात्र, सध्याच्या प्रचंड वाढलेल्या किमतींमुळे अनेकांनी सोन्या-चांदीची खरेदी टाळण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, मागणी कमी झाल्याने बाजारात सध्या मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे

विशेषज्ञांच्या मते, पुढील काही आठवड्यांतही सोन्या-चांदीच्या किमती उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनं खरेदी करायचं की थांबायचं, हा प्रश्न सामान्य ग्राहकांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीत, आगामी काळात सराफ बाजारातील हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या