प्रामाणिक सेवेसाठी अग्निशमन जवानांचा गौरव
संतोष तायडे व जगदीश साळुंखे यांना सन्मानपत्र प्रदान
जळगाव : शहरातील आपत्कालीन सेवांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या आस्थापना सूचीवरील कार्यरत वाहन चालक श्री. संतोष पंडित तायडे तसेच फायरमन श्री. जगदीश पुंडलिक साळुंखे यांना त्यांच्या प्रामाणिक, तत्पर व कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहणाऱ्या या जवानांनी आपल्या कर्तव्यदक्षतेची छाप पाडली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मानामुळे अग्निशमन दलातील इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक जोमाने काम करण्याची भावना बळकट होणार आहे. शहरातील विविध स्तरांतून या दोन्ही जवानांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
