Friday, May 1, 2026
Homeखानदेशजळगाव महापालिकेत ४२.६० कोटींचा घोटाळा उघड; अटलांटा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव महापालिकेत ४२.६० कोटींचा घोटाळा उघड; अटलांटा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव महापालिकेत ४२.६० कोटींचा घोटाळा उघड; अटलांटा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

रस्ते डांबरीकरणाच्या कामात आर्थिक अनियमितता;  आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग

जळगाव : शहरात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून मुंबईस्थित अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड विरोधात फसवणूक व विश्वासघाताचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जळगाव शहर पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक 127/2026 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 406, 409 आणि 420 अंतर्गत शुक्रवार, १ मे 2026 रोजी रात्री ९.१० वाजता नोंदविण्यात आला.
या प्रकरणात फिर्यादी म्हणून जळगाव महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता योगेश प्रकाश बोरोले (वय ४६) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मुंबई येथील अटलांटा कंपनीचे संचालक राजू अंबालाल वावरोट व संबंधित अधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचा विश्वास संपादन करून शहरातील पेवर मशीनद्वारे रस्ते डांबरीकरणाचा ठेका मिळवला होता.

मात्र, कंपनीने निर्धारित मुदतीत काम पूर्ण न करता नियमांचे उल्लंघन केले. तसेच Mobilisation Fund सह मूळ रक्कम, व्याज, दंड आणि महानगरपालिकेला करावा लागलेला अतिरिक्त खर्च यांचा मिळून तब्बल ₹४२,६०,७६,५६२ इतका आर्थिक फटका बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही कथित अनियमितता सन १९९७ ते २००६ या कालावधीत घडल्याचे समोर आले असून त्या वेळी ही योजना तत्कालीन नगरपरिषदेकडे होती.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास आर्थिक गुन्हे शाखा (EOW) जळगावकडे वर्ग करण्यात आला आहे. या घोटाळ्यात नेमके कोण-कोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास सुरू असून येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या