संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
मुंबई वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मागील महिना ते दीड महिन्यांपासून या प्रकरणात ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पुढे येत होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ७७ दिवस झाले असून याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे. पण या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, यांसह अन्य मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ मंगळवार (25) पासून सकाळी १० वाजल्यापासून अन्नत्याग आंदोलन केले होते . आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्या यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.