राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई वृत्तसंस्था
राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना आता तेरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्याच्या गृह खात्याने काढले आहेत.
त्यामध्ये मनोज कुमार शर्मा यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. त्याचसोबत आर बी डहाळे यांची राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीतून राज्य गुन्हे अभिलेख केंद्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावर बदली करण्यात आली आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी यशस्वी यादव यांची सायबर सेलच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावरून पदोन्नती झाली असून त्यांच्याकडे आता सायबर सेलच्या अपर पोलिस महासंचालकपदाचा पदभार असणार आहे.
बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे…
मनोज कुमार शर्मां- विशेष पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था
आर बी डहाळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अभिलेख केंद्र
शोक मोराळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग
राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल
निखील गुप्ता – अपर पोलिस महसंचालक, कायदा आणि सुव्यवस्था
सूरेश मेखला – अपर पोलिस महसंचालक, आर्थिक गुन्हे शाखा
यशस्वी यादव – अपर पोलिस महासंचालक, सायबर सेल
सुहास वारके – अपर पोलिस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा
अश्वती दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग
छेरिंग दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, विशेष अभियान
के एम मल्लिकार्जुन – अपर पोलिस महासंचालक, प्रशासन
अभिषेक त्रिमुखे – अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग
श्रेणिक लोढा – अपर पोलिस अधीक्षक, खामगाव बुलढाणा
दरम्यान राज्यात महायुतीचे नवीन सरकार आल्यानंतर विविध विभागांच्या बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे.