Sunday, June 15, 2025
Homeक्राईमराज्यातील ८७३ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश

राज्यातील ८७३ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश

राज्यातील ८७३ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश

मुंबई,: राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदल घडवून आणणारी महत्त्वाची घडामोड मंगळवारी घडली. पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ८७३ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये ३७० पोलीस निरीक्षक आणि ५०३ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

या बदल्यांमध्ये आंतरजिल्हा विनंती बदल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अनेक अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने विविध जिल्ह्यांत बदलीसाठी अर्ज केले होते, ज्याच्या आधारे हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

मुंबई पोलीस दलातही या बदल्यांचा प्रभाव दिसून येत आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन माने, सुनील सिंह पवार, चंद्रकांत सरोदे, रवींद्र वाणी, दादासाहेब घुटुकडे आणि राकेश मानगावकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.या प्रशासकीय बदलांमुळे राज्यातील पोलीस दलात नवचैतन्य निर्माण होईल, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात अधिक कार्यक्षमता येईल, असा विश्वास पोलीस महासंचालक कार्यालयाने व्यक्त केला आहे.

0नव्या नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवरही पोलीस यंत्रणेचे बळकटीकरण होण्याची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्या