Friday, June 20, 2025
Homeक्राईमपाचोरा येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले 68 हजाराचा मुद्देमाल लांबविला

पाचोरा येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले 68 हजाराचा मुद्देमाल लांबविला

पाचोरा येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले 68 हजाराचा मुद्देमाल लांबविला
पाचोरा प्रतिनिधी

शहरातील जामनेर रोडवर असणाऱ्या गांधी चौक येथील पाटील ज्वेलर्स दुकानाचे चैनल गेट आणि शटरची सेंटर लॉक तोडून दुकानातून 68 हजार रुपयांचे दागिने आणि सीसीटीव्ही कॅमेरा चा डीव्हीआर असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविण्याची घटना दोन फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राहुल विश्वनाथ चव्हाण वय 32 यांचे पाचोरा शहरातील गांधी चौकात सराफ बाजार मध्ये पाटील ज्वेलर्स नावाने दुकान आहे.

एक फेब्रुवारीच्या रात्री सव्वा आठ ते सकाळी दोन जानेवारीच्या ७ वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चव्हाण यांच्या दुकानाचे चॅनल गेट तोडून आतील शटर चे सेंटर लॉक उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानांमधील चांदीच्या अंगठ्या, सोन्याचे दागिने चांदीचे गळा या सीसीटीव्ही कॅमेरा चा डीव्हीआर अशा एकूण 68 हजार रुपयांचा एवज चोरट्यांनी चोरून नेला.

या प्रकरणी राहुल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे.

ताज्या बातम्या