Friday, June 13, 2025
Homeक्राईमदेवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; विवेक फणसाळकर सेवानिवृत्त

देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; विवेक फणसाळकर सेवानिवृत्त

देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; विवेक फणसाळकर सेवानिवृत्त

मुंबई | प्रतिनिधी मुंबई पोलिस दलाच्या नेतृत्वात मोठा बदल करत १९९४ बॅचचे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

सध्या विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) या पदावर कार्यरत असलेले भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबई आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार तसेच वरिष्ठ महिला अधिकारी अर्चना त्यागी यांची नावे चर्चेत होती. मात्र, गुन्हेगारीविरोधी कारवायांतील ठसठशीत कामगिरी आणि प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर देवेन भारती यांची निवड झाली.

भारती यांनी मुंबई पोलिस दलात गुन्हे शाखेचे अपर आयुक्त, उपायुक्त, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर यशस्वी कार्यभार सांभाळला आहे.

ताज्या बातम्या