जळगाव जिल्हाधिकारी पदाचा नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
जळगाव प्रतिनिधी ;– ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ रोहन घुगे यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी आपला पदभार स्वीकारला . यावेळी त्यांचे विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी स्वागत केले . जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी अधिकाऱ्यांकडून प्रलंबित योजना,रखडलेले प्रकल्प यांचा आढावा जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला .
रोहन घुगे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अनुभवी अधिकारी असून, त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात ठाणे जिल्ह्यात ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे कौतुक झाले आहे. त्यांचा हा अनुभव जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रोहन घुगे गुरुवारी सकाळी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात औपचारिकरित्या आपला पदभार स्वीकारणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सध्याच्या प्रकल्प आणि योजनांबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
