Tuesday, November 24, 2026
HomeBlogसोन्या-चांदीच्या घसरणीला ब्रेक; सोमवारी दरात मोठी उसळी, सोने १.३२ लाखांच्या पार

सोन्या-चांदीच्या घसरणीला ब्रेक; सोमवारी दरात मोठी उसळी, सोने १.३२ लाखांच्या पार

सोन्या-चांदीच्या घसरणीला ब्रेक; सोमवारी दरात मोठी उसळी, सोने १.३२ लाखांच्या पार

जळगाव, प्रतिनिधी : येथील सुवर्ण बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सोने-चांदीच्या घसरणीला आता ब्रेक लागला असून, नव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या सप्ताहात सोने १२ हजार ४२२ रुपयांनी, तर चांदी तब्बल २० हजार ६०० रुपयांनी स्वस्त झाली होती. मात्र, शनिवारपासून सुरू झालेली दरवाढ सोमवारीही कायम राहिल्याने बाजारात पुन्हा तेजीचे वारे वाहू लागले आहेत.

गेल्या शनिवारी सोन्याच्या दरात ५१५ रुपये, तर चांदीच्या दरात १ हजार ३० रुपयांची वाढ झाली होती. रविवारी सुट्टीमुळे बाजार बंद राहिल्यानंतर सोमवारी सकाळी बाजार उघडताच शनिवारच्या तुलनेत दोन्ही धातूंच्या दरात पुन्हा वाढ झाली. विशेष म्हणजे, दुपारनंतर दरवाढीचा वेग अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले.

सोमवारी दरात मोठी उसळी सोमवारी बाजार बंद होताना शनिवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार १४१ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात तीन टक्के जीएसटीसह सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ३२ हजार ४९९ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात ५ हजार १५० रुपयांची वाढ झाल्याने तीन टक्के जीएसटीसह चांदीचा दर प्रति किलो १ लाख ६३ हजार ७७७ रुपयांवर गेला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आता दरांनी पुन्हा उसळी घेतल्याने सुवर्ण बाजारातील चढ-उतार कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात सोने-चांदीचे दर कोणत्या दिशेने वाटचाल करतात, याकडे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या