घरात कोणीही नसताना तरुणाने घेतला टोकाचा निर्णय..
जळगाव : घरामध्ये कोणीही नसताना तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दिनांक 12 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणाचे आई-वडील हे कामाला गेल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याचा प्रकार उघडकीस आल.
ज्ञानेश्वर कडू साळुंखे (वय २८, रामेश्वर कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मयत ज्ञानेश्वर हा शहरातील एका रुग्णालयात कामाला असून तो त्याच्या आई-वडिलांसह शहरातील रामेश्वर कॉलनी भागात राहत होता. आई आणि वडील दोघेही कामावर निघून गेल्यानंतर त्याने बुधवार 12 फेब्रुवारी रोजी एका मित्राला गळफास घेण्यापूर्वी फोन लावून विचारणा केली. यानंतर मय तरुणाचा मित्र हा शुभम घरी आल्यावर त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत ज्ञानेश्वर साळुंखे हा दिसून आला.
शेजाऱ्यांच्या मदतीने ज्ञानेश्वर साळुंखे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.