खर्ची रवंजा येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू
एरंडोल प्रतिनिधी l खर्ची रवंजा (ता. एरंडोल) येथे १६ मे २०२५ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास वीज पडून शरद रामा भिल्ल (वय ४०, रा. कमतवाडी, ता. धरणगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शरद हे आपल्या सासऱ्याकडे (लक्ष्मण श्रावण ठाकरे, रा. खर्ची रवंजा) आले असताना वादळी पावसात विजेचा कडकडाट झाला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे एएसआय राजेश पाटील आणि हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या अपघाताने परिसरात शोककळा पसरली असून, भिल्ल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.