Friday, June 13, 2025
Homeक्राईमकंटेनर कारवर कोसळून झालेल्या अपघातात सहा जण ठार

कंटेनर कारवर कोसळून झालेल्या अपघातात सहा जण ठार

बंगळुरू जिल्ह्यातील घटना , मृत सांगली जिल्ह्यातील रहिवासी

बंगळुरू वृत्तसंस्था :- भरधाव कंटेनर चालत्या गाडीवर कोसळल्यानं एकाच कुटुंबातील सहा जण चिरडून ठार झाल्याचे घटना कर्नाटकच्या बंगळूर जिल्ह्यातील नेलमंगल महामार्गावर घडले. कारमधील मयत हे सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील मोरबगी गावातील रहिवासी असून . ख्रिसमसच्या सुट्टीसाठी गावी येत असताना हा भीषण अपघात घडला आहे.

मृतामध्ये चंद्रम इगाप्पागोळ (वय 45), त्यांची पत्नी धोराबाई (वय 40) मुलगा गण (वय 16), मुली दिक्षा (वय 10), आर्या (वय 6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (वय 35) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रम इगाप्पागोळ ( वय 46) हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावातील रहिवासी होते. ते बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते. ख्रिसमसच्या सुटीनिमित्त चंद्र इगाप्पागोळ व त्यांचे कुटुंबीय तसेच त्याच्या भावाची पत्नी बंगळुरू येथून जत तालुक्यातील गावी जात होते.दोन कंटेनर ट्रकच्या धडकेनंतर एक कंटेनर कार आणि दुचाकीवर पलटी झाला, त्यामध्ये चिरडून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.कंटेनर ट्रकचे वजन जास्त असल्याने कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि कारच्या आत असलेले लोक चिरडले गेले. त्यामुळे कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला.

ताज्या बातम्या