जळगाव प्रतिनिधी ;- डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयातील पी. एचडी. च्या संशोधक विद्यार्थिनी श्वेता फेगडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अविष्कार 2024 या संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत संशोधक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विभागातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे.
त्यांच्या संशोधनाचा विषय लिव्हरेजिंग मशीन लर्निंग फॉर डिटेक्टींग पेस्टिसाइड रेसिड्युज ऑन स्पिनच लिव्हज असा होता. त्यांना डॉ सौ मोनाली खाचणे यांनी मार्गदर्शन केले. श्वेता फेगडे ह्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व राज्य पातळीवर आविष्कार स्पर्धेत करणार आहेत. श्वेता फेगडे यांचे प्राचार्य डॉ गौरी राणे ,उपप्राचार्य डॉ व्ही जे पाटील, उपप्राचार्य डॉ पी एन तायडे यांनी अभिनंदन केले.