Saturday, June 20, 2026
Homeक्राईमराजमालती नगरात बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू ; सात ते आठ जण ताब्यात

राजमालती नगरात बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू ; सात ते आठ जण ताब्यात

जळगाव:-दोन गटात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या तुफान हाणामारी मध्ये एक जणांचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती कळतात पोलीस अधीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

सिद्धार्थ माणिक वानखेडे वय 36 रा. राज मालती नगर असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राजमालती नगर परिसरात आज दोन गटात 20 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान झाली. यात सिद्धार्थ माणिक वानखेडे याला आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केल्याने या माराने त्याचा मृत्यू झाला तर विशाल अजय सुरवाडे वय,28 जानू संजू पाटील वय 21 ,महमूद हाजी बिस्मिल्ला पटेल 42 , भाईजान राजू पाटील वय 24 आदी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.

याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या