Monday, August 3, 2026
HomeBlogमाचले येथे स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंत...

माचले येथे स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण

माचले येथे स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण

माचले (ता. चोपडा) , दिनांक 3 ऑगस्ट :
गुळी नदी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ रूखणखेडे संचलित आईसाहेब चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय, माचले येथे स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना ‘स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम शिष्यवृत्ती’ वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात झाला .

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तसेच स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन व भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थांनीदेखील प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या सोहळ्यास जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका श्रीमती शैलजादेवी दिलीप निकम, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, संस्थेचे अध्यक्ष प्रविण निकम, उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, सचिव घनश्याम निंबाजी पाटील, ‘सॉफ्टएड कॉम्प्युटर’चे संचालक रितेश निकम,संस्थेचे संचालक हिरालाल पाटील, ॲड. रविंद्र निकम, खंडू पाटील, हेमलाल पाटील, इंद्रभान पाटील, देवकिनंदन पाटील, पंडित पाटील, राजेंद्र पाटील, सतिष सुर्यवंशी, उत्तम पाटील, प्रविण पाटील, छन्नू पाटील, तुळशीराम पाटील, संतोष पाटील, भागवत पाटील ,अरुण पाटील, नितीन निकम ,गुलाब पाटील, चंद्रशेखर पाटील ,शेखर पाटील ,मोहन पाटील ,सुरेश पाटील , अमर देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांनी आपले वडील स्व. भाईसाहेब यांच्या कृषी आणि सहकार क्षेत्रातील प्रेरक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोडी व स्पर्धात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वडील स्व. दिलीप भाईसाहेब यांच्या स्मृतिदिनी हा उपक्रम राबवून या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी या पुरस्कार सोहळ्यात मोठी प्रेरणा मिळते,” असे प्रतिपादन यावेळी रोहित निकम यानी केले.

यंदा इयत्ता ५ वी ते १० वी मधील गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या १८ विद्यार्थ्यांना एकूण १२,२०० रुपयांच्या रोख स्वरुपात शिष्यवृत्तीचे वितरण यावेळी करण्यात आले. शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
पूर्वी ज्ञानेश्वर पाटील५ वी ९२% ,निकिता सूर्यभान भिल ५ वी ९०.५%, मीनाक्षी दिनेश वारेला ५ वी ८८.५% , आरती समाधान रुपवते ६ वी ८९.११% ,दिव्या सुनील भिल ६ वी ८७.३३% , शारदा उदयसिंग भिल६ वी ८५.४४% , गायत्री नितीन पाटील ७ वी ८६.८९% , आराध्या लहू भिल ७ वी ८४.५६% ,वैभवी नथ्थू कोळी ७ वी८३.७८% , मयुरी मछिंद्र वाघ ८ वी ८९.७% ,राजहंस नवल साळुंखे ८ वी ८९.४% , बादल विनोद भिल ८ वी ८९.१% , साक्षी ज्ञानेश्वर पाटील ९ वी ७९.६७% , तनुजा पंडीत कोळी ९ वी ७९.५% , कल्याणी भीमराव ठाकूर ९ वी ७८.६७% , साधना नारायण सांगोळे १० वी ७६.४% ,दीक्षा योगराज शिंदे १० वी ७१.२% , दैवेन शांताराम पाटील १० वी ६८.८%

कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांनी शिष्यवृत्ती प्राप्त सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या