Saturday, August 1, 2026
Homeखानदेशअण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन

भुसावळ | प्रतिनिधी

नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व आदरांजली कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस, तर सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महापुरुषांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय

यावेळी सरला सावकारे, संध्या धांडे, डॉ. प्रदीप साखरे आणि संजीव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक परिवर्तनातील योगदान तसेच श्रमिक व वंचित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेले कार्य आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या घोषणेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

महापुरुषांचे विचार जीवनात अंगीकारा

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी अण्णाभाऊ साठे हे समाजजागृती करणारे क्रांतिकारी साहित्यिक, तर लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्यांचा आदर्श जीवनात अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सरला सावकारे, शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे, वरिष्ठ लिपिक प्रविण चौधरी, ग्रंथपाल अरुण नेटके यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुनम देवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी. के. भंगाळे, नाना पाटील, मनोज किरंगे, निलेश बोराडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, लक्ष्मण पवार, राजेंद्र बागुल आणि रोहन पाटील यांनी परिश्रम घेतले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या