Thursday, July 9, 2026
Homeखानदेशगोदावरीला हंगामातील पहिला पूर; नांदूरमध्यमेश्वरमधून ५६ हजार क्युसेक विसर्ग

गोदावरीला हंगामातील पहिला पूर; नांदूरमध्यमेश्वरमधून ५६ हजार क्युसेक विसर्ग

गोदावरीला हंगामातील पहिला पूर; नांदूरमध्यमेश्वरमधून ५६ हजार क्युसेक विसर्ग

नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा जोर; रामकुंड परिसर जलमय, आजही रेड अलर्ट

नाशिक | प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर नाशिक जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने जोर धरला. संततधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला असून रामकुंड परिसरातील पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. वाढत्या पाण्यामुळे दुतोंड्या मारुती मंदिराच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले असून गोदाकाठावरील अनेक लहान मंदिरे आणि टपऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत.

धरणातून ५६ हजार क्युसेक विसर्ग

गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून सुमारे ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी पुणे घाटमाथा, सातारा, नाशिक, कोल्हापूर घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारपासून विश्रांतीचे संकेत

राज्यातील मुसळधार पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची शक्यता असून शुक्रवारपासून अनेक भागांत पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या